धोनीला धमकी! काळजी घे झिवाची, मी कधीही तीला किडनॅप करू शकते!

महेन्द्र सिंग धोनीची मुलगी झिवा हिच्या क्रिकेटच्या मैदानावरच्या बाललीला अनेकांनी पाहिल्या असतील. अनेकदा चिमुकली झिवा पापाला चीअर अप करताना दिसते. तिचा हा अंदाज पाहुन जो तो तिच्या प्रेमात पडतो.

झिवाच्या प्रेमात पडलेली अशीच एक व्यक्ति म्हणजे, प्रिती झिंटा. प्रिती झिवाच्या इतकी प्रेमात आहे की, तिने चक्क तिला किडनॅप करण्याची धमकीच धोनीला दिली आहे. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे.

‘ धोनीचे अनेक चाहते आहेत, मी सुद्धा त्यापैकीच एक. पण आता मी चिमुकल्या झिवाची फॅन आहे. सध्या मी धोनीला एकच सांगेल, ते म्हणजे त्याने काळजी घ्यावी. कारण मी कधीही झिवाला किडनॅप करू शकते,’ असे प्रितीने या फोटोसोबत लिहिले.