‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणात काँग्रेस नेत्यांचा आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा उद्देश’

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रोज काहीतरी नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. कालच सुशांतच्या वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणावरून मोठं राज्जाकरण देखील होताना पाहायला मिळत आहे. भाजपनेते सुब्रमण्यम स्वामी हे रोज नवे आरोप करत आहेत तर दुसऱ्या बाजूला कंगना राणावत ही सुद्धा घराणेशाहीवर सडकून टीका करत आहे.

आता या प्रकरणात बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी उडी घेतली आहे. मायावती यांनी या संपूर्ण प्रकरणाची सीबाआयद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे.मायावती ट्विट करत म्हणाल्या की, मूळचा बिहारचा तरुण बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत.

त्याच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरनंतर या प्रकरणाचं गूढ आणखीन वाढलंय. आता या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र किंवा बिहार पोलिसांकडून होण्याऐवजी सीबाआयद्वारे होणं योग्य आहे’ असं मायावतींनी सांगितले आहे.

तसेच सुशांत राजपूत प्रकरणात महाराष्ट्र आणि बिहारच्या काँग्रेस नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे असं दिसतंय की त्यांचा खरा हेतू या प्रकरणाच्या आडून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा आहे, अशी टीका देखील मायवती यांनी काँग्रेसवर केली आहे. त्याचप्रमाणे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने गंभीरता दाखवावी, असं देखील मायवती यांनी सांगितले आहे.

 

You might also like