ठाण्यात रंगणार महाराष्ट्र सेलिब्रिटी क्रिकेट लिग

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सितारे १, २ आणि ३ फेब्रुवारी रोजी ठाण्यात क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. निमित्त आहे ‘महाराष्ट्र सेलेब्रिटी क्रिकेट लिग’ या स्पर्धेचे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या दादोजी कोंडदेव स्टेडियमचे उद्घाटन या स्पर्धेने होणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच या प्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात स्पर्धेच्या ट्रॉफी आणि थीमसॉंगचे अनावरण करण्यात आले.
‘महाराष्ट्र सेलेब्रिटी क्रिकेट लिग’ या स्पर्धेचे यंदा पहिलेच वर्ष आहे. याप्रसंगी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, महापालिकेने नूतनीकरण केलेल्या स्टेडियमचे उद्घाटन या स्पर्धेने होत आहे ही उत्तम बाब आहे, या ठिकाणी भविष्यात स्थानिक खेळाडूंना उच्च दर्जाच्या अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध होतील.
या स्पर्धेचे थीमसॉंग सोहम पाठक यांनी तयार केले असून गीत विजू माने यांचे आहे तर प्रसेनजीत कोसंबी याने गायले आहे. तसेच स्पर्धेसाठी विकास रेपाळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री दीप्ती देवी हिने केले.
या स्पर्धेत उपेंद्र लिमये, राजेश शृंगारपुरे, संजय नार्वेकर, विनय येडेकर, अतुल परचुरे, हृषीकेश जोशी, प्रथमेश परब, अनिकेत विश्वासराव, प्रविण तरडे, शरद केळकर, समिर धर्माधिकारी, अंगद म्हसकर, माधव देवचक्के, निरंजन नामजोशी, सुनील अभ्यंकर, विजय आंदळकर, अमित भंडारी, अमित फाळके, मंगेश कुलकर्णी , दीपक देऊळकर,बवेश जानवलेकर , विनोद घाटगे, कपिल देशपांडे ,विराज मुळ्ये यांच्यासह अनेक सेलेब्रिटींचा सहभाग असणार आहे.
महत्वाच्या बातम्या –