ठाण्यात आजपासून रंगणार महाराष्ट्र सेलिब्रीटी  क्रिकेट लीग

लोकप्रिय मराठी कलाकारांचा समावेश असणाऱ्या महाराष्ट्र सेलिब्रीटी क्रिकेट लीग (MCCL) ला आजपासून ठाण्यात सुरुवात होत आहे. नुकतेच नुतनीकरण करण्यात आलेल्या ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमचे या स्पर्धेद्वारे उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेत चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार, माध्यम प्रतिनिधी आणि राजकीय नेते यांच्यात रंगणार क्रिकेट सामने रंगणार आहेत. दि. १ फेब्रुवारी सकाळी ८:३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत १०० वादकांच्या ढोलताशाच्या गजरात स्टेडीयमचा उद्घाटन सोहळा पार पडणार असून या प्रसंगी आदिवासी नृत्याचे सादरीकरण होणार आहे.

महाराष्ट्र सेलिब्रीटी क्रिकेट लीगचे आयोजन ठाणे महानगरपालिका आणि दिग्दर्शक विजू माने, आकाश पेंढारकर व संदीप जुवाटकर यांनी केले आहे. तसेच डी.बी. एन्टरटेनमेंटचे दिलीप भगत सह-आयोजक आहेत.

या स्पर्धेत सहा संघ सहभागी असून ‘मुंबईचे मावळे’ या संघाचे कर्णधार संजय जाधव, ‘बाणेदार ठाणे’ या संघाचे कर्णधार अंकुश चौधरी, ‘कोकणचे वाघ’ या संघाचे कर्णधार सिद्धार्थ जाधव, ‘खतरनाक मुळशी’ या संघाचे कर्णधार प्रविण तरडे, ‘पराक्रमी पुणे’ या संघाचे कर्णधार सौरभ गोखले असून ‘लढवय्ये मिडिया’ या संघाचे कर्णधार बवेश जानवलेकर (हेड झी टॉकीज, झी युवा) आहेत.

महाराष्ट्र सेलिब्रीटी  क्रिकेट लीग (MCCL) मध्ये सहभागी कर्णधार आणि कलाकारांच्या परिचयानंतर खेळपट्टीवर जाऊन स्पर्धेचे उद्घाटन केले जाईल. ही स्पर्धा दि. १ ते ३ फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना ‘बाणेदार ठाणे’ विरुद्ध ‘मुंबईचे मावळे’ यांच्यात रंगणार आहे. त्यांनतर ‘खतरनाक मुळशी’ विरुद्ध ‘लढवय्ये मिडिया’ आणि ‘मुंबईचे मावळे’ विरुद्ध ‘पराक्रमी पुणे’ हे सामने होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –