महाविकासआघाडीने माझ्या नावाचा विधानपरिषदेसाठी विचार करावा – सुरेखा पुणेकर

करराज्यात राज्यपालनियुक्त विधान परिषद जागांची जोरदार चर्चा सुरू आहे. एकूण बारा जागांसाठी कोणता पक्ष किती जागा घेणार यावर अजून एकमत झाल नसल तरी इच्छुकांनी मात्र आपली वर्णी लावण्यासाठी अनेकांकडून फिल्डिंग लावली जात आहे.

अनेक नेत्यासोबत काही सामाजिक क्षेत्रातील लोकांनी आपली वर्णी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यातच लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी देखील विधानपरिषदेसाठी आपल्या नावाचा विचार करावा अशी विनंती केली आहे.

याआधी सुरेखा पुणेकर यांची पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून चर्चा झाली. पण, उमेदवारी काही मिळाली नाही. त्यामुळे विधानपरिषदेसाठी उमेदवारी मिळावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रवादी किंवा शिवसेना या पक्षांनी उमेदवारी दिली नाही तर कमीत कमी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी तरी माझ्या नावाचा विचार करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

You might also like