सुशांतच्या आत्म्याला तरी शांततेत राहू द्या, हितेन तेजवानी वैतगला

सुशांत आता या जगात नाही परंतु या सिनेमातील आपल्या दमदार कामाच्या माध्यमातून तो नेहमीच रसिकांच्या मनात राहणार आहे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील मानवची भूमिका सुशांत नंतर हितेन तेजवानीने साकारली होती, रोज सुशांतमृत्यू प्रकरणाबाबत विविध खुलासे होत आहे. हे प्रकरण कुठेतरी भरकटत असल्याचे अनेकांनी म्हटले होते.

सतत त्याच त्या बातम्याही आता नकोशा झाल्याचे हितेनने म्हटले आहे. “आम्हाला सुशांत सिंग राजपूत प्रकरण आता बंद करण्याची गरज आहे. आयुष्य पुढे सरकत राहते आणि आपल्याकडे जे काही उरले आहे ते म्हणजे आठवणींना जोडण्याचा प्रयत्न करणे. मात्र सध्या अनागोंदी कारभार सुरू आहे. मृत्यूनंतर तरीही सुशांत आत्म्याला शांती मिळो हीच प्रार्थना करतो.सुशांत प्रत्यक्षात आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणींच्या रुपात तो कायमच आपल्यात राहणार आहे असे त्याने सांगितले आहे.

 

bollywoodBollywood News in Marathi – Get latest Entertainmentcelebrity gossipsHollywood newsMarathimovie reviewsphotostrailersTV show newsupdatesvideos. जाणून घ्या बॉलीवुडफिल्मनगरीच्या ताज्या बातम्याबॉलिवूड गॉसिप्सबॉलिवूड घडामोडीबॉलिवूडचे नवीन चित्रपटमराठीहितेन तेजवानी