जाणून घ्या ‘आसूड’ चित्रपटातील अभिनेता ‘अमित्रियान पाटील’ बद्धल

अन्यायाविरोधात संघर्षाची ठिणगी पेटवत शेतकऱ्यांच्या हितासाठी एका युवकाचा व्यवस्थेविरोधातला धडाकेबाज लढा दाखवणारा ‘आसूड’ हा चित्रपट ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’ चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर यांचे आहे.
विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंत,राणा जंगबहादूर, अवतार गील,अमित्रीयान पाटील,रश्मी राजपूत हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाची सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहे. कथा-पटकथा आणि संवाद निलेश रावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत.
या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत असलेल्या अमित्रियान पाटील यांनी ‘आसूड’ या चित्रपटा बद्धलचा अनुभव Cineplex Marathi ने घेतलेल्या मुलाखतीत सांगितिला.
अमित्रियान आसूड चित्रपटामध्ये एका तरुण गावाकडच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्या भूमिकेचं नाव आहे ‘शिवाजी पाटील’. या शिवाजीला शेतीबद्धल प्रचंड तिरस्कार असतो त्याच्या आयुष्यात असे काही क्षण येतात की, तो राजकीय सिस्टिम मध्ये ओढल्या जातो आणि त्याला कळते कि त्याच्या आजूबाजूला सगळीकडे फक्त भ्रष्टाचार चालू आहे आणि नंतर तो या सिस्टिमविरोधात कसा लढा करतो, गाव पासून तर शहरा पर्यंत आणि शहरा पासून तर दिल्ली पर्यंत आणि कसा तो पूर्ण सिस्टिम बदलतो हे या चित्रपटामध्ये सांगण्यात आले आहे. या चित्रपटाचे शूटिंग विदर्भ , मराठवाडा आणि दिल्ली येथे करण्यात आले आहे.
या चित्रपटामध्ये खूप भावनिक सीन आहेत. या इमोशनल सीन्सबद्दल सांगताना अमित्रियान म्हणाला काही सीन्समुळे माझी विचारसरणी पूर्णच बदलून गेली आणि त्याने त्यातील एक सीन त्याला खूप आवडला. Cineplex Marathi च्या मुलाखतीत त्याने या सीनबाबतची आठवण सांगितली. “आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शूट करत होतो आणि आम्हला ७०० ते ८०० लोक शूट साठी पाहिजे होती पण ती लोक गावाकडची असल्यामुळे त्यांना माहित नव्हते कि, शूट मध्ये थांबावं लागतं, कोणी पण कधी पण निघुन जायचे पण माझा एक सीन इतका इमोशनल होता कि तो शूट होत असताना लोकं रात्र झाली असताना सुद्धा थांबली होती पूर्ण शूट त्यांनी बघितले आणि त्या नंतर २ – ३ लोक मला येऊन भेटले आणि म्हणाले की, ‘तू त्या डायलॉगच्या माध्यमातून आमच्या मनातलं बोललास जे मला इतकं वर्ष बोलायचं होत ते तू बोललास आणि मला त्यांचे ते बोलणे ऐकून बऱ्याच वर्ष ने थिएटरच अनुभव आला असे वाटले” असे अमित्रियानने सांगितले.
या चित्रपटामध्ये जेष्ठ अभिनेते विक्रम गोखलेही एका नेत्याच्या भूमिकेत आहेत. विक्रम गोखलेंसोबतचा अमित्रियान याचा पहिला चित्रपट. विक्रम गोखले यांच्यासोबत काम करतानाच अनुभवही अमित्रियानने सांगितला. तो म्हणाला, मला विक्रम गोखले यांच्या सोबत फारच छान आणि चांगला अनुभव आला, ते नवीन पिढी ला जागा देतात आणि त्यांची जागा निर्माण करतात, एक शिस्त प्रिय पण तेवढाचं ‘डाउन टू अर्थ’ माणूस आहे. त्यांच्या सोबत काम करताना मला खूप मज्जा आली. आणि खूप काही शिकायलाही मिळाले.
कोण आहे अमित्रियान पाटील ?
अमित्रियान पाटील एका मराठमोळा अभिनेता. अमित्रियानने ‘मनाया-द वंडर बॉय’ या चित्रपटातून मराठी चित्रपटश्रुष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्याने ‘राजवाडे अँड सन्स’ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत काम केले. त्यानंतर अमित्रयानने बॉईज – २ मध्ये आपली चांगलीच कामगीरी दाखवली आणि आता अमित्रियान एका वेगळ्या भूमिकेत ‘आसूड’ या चित्रपटात झळकणार आहे. केवळं मराठी नाही तर त्याने राम गोपाल वर्मा यांच्या तेलगू चित्रपट ‘सत्या-२’ मध्ये देखील काम केले आहे. २०११ मध्ये अमित्रियानला सर्वोत्कृष्
अमित्रियानला संगीत आणि गिटार वाजवायाला आवडते, त्याच्या विनामूल्य वेळात तो कविता आणि गाणी लिहितो. अमित्रियान याचा जन्म अकोल्याचा. अमित्रियान एक इंजिनिअर असून त्याने मुंबईतून जाहिरात आणि जनसंपर्क पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.