‘छत्रीवाली’ मालिकेतील विक्रमच्या ‘कबीर सिंग’ लूक

‘छत्रीवाली’ या मालिकेत नवं वळण आलंय. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या विक्रम-मधुरामधलं नातं आता संपलंय. आपल्या वडिलांचा खून विक्रमच्या वडिलांनीच केलाय हे कटू सत्य मधुरासमोर उघड झाल्यानंतर मधुराने विक्रमपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
मधुराच्या निर्णयाने खचलेला विक्रम आजही आपलं प्रेम विसरलेला नाही. नातं संपलं असलं तरी प्रेम नाही. आजही मधुरा परत येईल असा विश्वास त्याला वाटतोय. विक्रम-मधुराला पुन्हा एकत्र आणणारा क्षण मालिकेत येईल का याची उत्सुकता आहे.
कबीर सिंह सिनेमातल्या शाहिद कपूरच्या लूकशी मिळता-जुळता असा विक्रमचा लूक आहे. मधुराचं मन पुन्हा जिंकण्यात विक्रमला यश मिळणार का? हे ‘छत्रीवाली’ मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल.