लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणीत सलमान खान भावुक

लक्ष्मीकांत बेर्डे हे केवळ मराठीतील सुपरस्टार नव्हते. तर त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांसोबत काम केले.

सलमान खान सोबत तर त्यांनी साजन, मैंने प्यार किया, हम आपके है कौन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि विशेष म्हणजे यातील त्यांचे अनेक चित्रपट प्रचंड गाजले.

सलमान खान सध्या भारत या त्याच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटात कतरिना कैफ त्याची नायिका आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो नुकताच एका रिअॅलिटी शोच्या सेटवर गेला होता. त्यावेळी त्या शो मधील एका स्पर्धकाने साजन या चित्रपटातील तुमसे मिलने की तमन्ना है या गाण्यावर नृत्य सादर केले. हा परफॉर्मन्स पाहाताना सलमान भावुक झाला आणि त्याने लक्ष्मीकांत यांच्या आठवणींना उजाळा दिला.

 

You might also like