‘कृतांत’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘कृतांत’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. येत्या १८ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.या चित्रपटात संदिप कुलकर्णी एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.संदिप कुलकर्णी यांच्या जोडीला सुयोग गोऱ्हे, विद्या करंजीकर, सायली पाटील आणि वैष्णवी पटवर्धन यांनी या चित्रपटात अभिनय केला आहे.

शरद मिश्रा या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटातील गीतांना विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिलं आहे. दिग्दर्शक दत्ता भंडारे यांनीच  ‘कृतांत’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखनही केले आहे.

संदिप कुलकर्णी म्हणाले की, आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा ही भूमिका खूपच वेगळी आहे. केवळ गेटअपच्या बाबतीतच नव्हे तर विचारसरणीच्या पातळीवरही मानवतेचे दर्शन घडवणारी आहे. या चित्रपटातील माझा गेटअप काहीसा वेगळा असला तरी कथानक मात्र आजच्या काळातील आहे. आजचे जीवन आणि जगण्याचे तत्त्वज्ञान यांचे अचूक समीकरण या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like