क्रिती सनॉन म्हणते…..माधुरीची भेट हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण

क्रिती सनॉनला ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. या चित्रपटानंतर तिने ‘बरेली की बर्फी’,’स्त्री’, ‘दिलवाले’, ‘कलंक’ या चित्रपटांमध्ये काम केलं. उत्कृष्ट अभिनय शैली आणि लूकमुळे आज ती अनेकांच्या मनावर राज्य करते.
‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटातून क्रिती झळकणार आहे. या चित्रपटात ती पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. नुकतंच चित्रपटाचे प्रमोशन करताना एका डान्स रिऍलिटी शो मध्ये क्रिती धक धक गर्ल माधुरी दीक्षितला भेटली. क्रिती माधुरीची खूप मोठी चाहती आहे. क्रितीने तिच्या इंस्टाग्राम खात्यावरून माधुरीसोबत काही फोटो शेअर केले आहेत.‘अर्जुन पटियाला’ २६ जुलै २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.