‘कंगनानं मणिकर्णिकाची वाट लावली नाही हेच सुदैव म्हणावं’

कंगनाचा रणौतचा ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांशी’ चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या दिग्दर्शनची धुराही कंगनानेचं सांभाळली आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक क्रिश यानं सप्टेंबर महिन्यात चित्रपट अर्धवट सोडला होता. कंगनाच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे त्यानं चित्रपट सोडला असल्याच्या चर्चा होत्या. ‘मणिकर्णिका’ प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्यांदाच यावर क्रिशनं मौन सोडलं आहे.
एका मुलाखतीत त्यानं कंगनानं केलेल्या हस्तक्षेपावर आपली नाराजी बोलून दाखवली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं श्रेय घेण्याइतकी पात्रता कंगनात नाही. संपूर्ण चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं श्रेय स्वत: घेऊन ती शांत झोपूच कशी शकते असा खोचक प्रश्न क्रिशनं ‘स्पॉट बॉय’ला दिलेल्या मुलाखतीत विचारला आहे.
‘कंगनानं २० ते २५ टक्के भागाचं दिग्दर्शन केलं आहे. तर उत्तरार्धातील मी चित्रीत केलेली अनेक दृश्य कंगनानं पुन्हा चित्रीत केली आहेत. मी दिग्दर्शित केलेली दृश्यं ही भोजपूरी चित्रपटासारखी वाटत आहेत असं तिनं मला खोचकपणे सांगितलं होतं. आताचा मणिकर्णिका मी पाहिला, चित्रपट उत्कृष्ट आहे. कंगनानं मणिकर्णिकाची वाट लावली नाही हेच सुदैव म्हणावं’ असं म्हणत क्रिशनं या चित्रपटाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मी सध्या चार स्क्रिप्टमध्ये बिझी आहे – आमिर खान
- रोहित शेट्टीच्या चित्रपटात झळकणार ‘हा’ अभिनेता
- आता ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ येणार ‘ह्या’ भाषेत; बनणार रिमेक
- परिणीती चोप्राला मिळाला मोठा ब्रेक; साऊथ इंडस्ट्रीत करणार काम