किशोर प्रधान यांच्या पार्थिवाववर उद्या अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे आज निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच १३ जानेवारी सांताक्रुज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. वयाच्या 83 व्या वर्षी मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

किशोर प्रधान यांनी मराठी चित्रपट, इंग्रजी चित्रपट, हिंदी चित्रपट, छोटा पडदा आणि जाहिरातींमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘शिक्षणाचा आयचा घो’, लालबाग परळ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, भिंगरी ते त्यांचे गाजले मराठी चित्रपट आहेत.

तर हिंदीत ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘जब वुई मेट’ सिनेमातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल्या.पत्नी शोभा यांच्यासह त्यांनी दूरदर्शनवर सादर केलेला गजरा कार्यक्रम लोकप्रिय ठरला. विविध नाटकंही दिग्दर्शित केलीत. किशोर प्रधान यांनी 100 हून अधिक मराठी सिनेमांमध्ये, तर 18 इंग्रजी नाटकांमध्ये काम केलं.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like