‘त्या’ आजीला मदत करणाऱ्यांवर संतापले केदार शिंदे

काठीच्या सहाय्यानं कसरती करणाऱ्या एका आजीचा व्हिडीओ गेल्या काही दिवसं पासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांसह सगळेच या आजीच्या मदतीला  सरसावले आहे.

मात्र, या आजीला मदत करताना अनेकांनी मदतीचे व्हिडीओ काढले. त्याचबरोबर त्या आजीला पुन्हा त्या कसरती करण्याची मागणीही केली. त्यावरून दिग्दर्शक केदार शिंदे चांगलेच संतापले. शांताबाई पवार या आजीचा रस्त्यावर काठ्या फिरवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. सिनेसृष्टीतील कलाकारांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. त्याचबरोबर इतर नागरिकांनाही या आजीला आपापल्या परीनं मदत केली.

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. ट्विट करून त्यांना याबद्दलचा संताप बोलून दाखवला. “त्या आजीचा व्हिडीओ गाजतोय. चहूबाजूनं मदत जाहीर होतेय. काहीतर लागलीच पोहोचून मदत करतायेत. करायलाच हवी. पण त्या मदतीचे व्हिडीओ काढणं आणि आजीला पुन्हा तेच तेच करून दाखवायला लावणं किती संयुक्तिक आहे? लाज वाटायला हवी,” असं केदार शिंदे यांनी म्हटलं आहे.

You might also like