ह्या दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत झळकणार कतरिना कैफ

कतरिना कैफने चंदेरी दुनियेमध्ये स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ती लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे.

कतरिना ‘भारत’ चित्रपटामध्ये व्यस्त असून या चित्रपटानंतर ती चित्रपट दिग्दर्शक सुकुमार यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू स्क्रीन शेअर करणार असून ही जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

सध्या या चित्रपटाविषयी केवळ चर्चा सुरु असून अद्याप या चित्रपटाचं नाव निश्चित झालेलं नाही.विशेष म्हणजे महेश बाबूने या चित्रपटासाठी होकार कळविला असून कतरिनाने मात्र अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचं सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like