‘या’ चित्रपटाच्या सेटवरील कार्तिकचा लूक व्हायरल

कार्तिक त्याचा आगमी चित्रपट ‘पती पत्नी और वो’च्या चित्रीकरणासाठी लखनऊला रवाना झाला आहे. या चित्रपटात कार्तिकसह भूमि पेडणेकर आणि अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
नुकताच या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये कार्तिक एकदम वेगळ्या अंदाजात दिसत आहे.
दरम्यान तो एका खिडकीबाहेर उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. कार्तिकचा हा वेगळा अंदाज पाहून चाहत्यांची चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने भूमि, अन्यना आणि कार्तिक हे त्रिकूट पहिल्यांदा काम करत आहेत. हा चित्रपट जानेवारी २०२०मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.