कार्तिक-क्रितीच्या ‘लुकाछुपी’चा ट्रेलर प्रदर्शित

मडॉक फिल्म ‘लुकाछुपी’ हा नवा धमाकेदार चित्रपट घेऊन येणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन व क्रिती सॅनन ही जोडी दिसणार आहे. गेल्या काही दिवसांत या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स प्रदर्शित झाले. आता ‘लुकाछुपी’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे.

या ट्रेलरमध्ये लग्नासाठी उतावीळ असलेला कार्तिक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. तो लग्नासाठी क्रितीला प्रपोजही करतो. पण क्रिती त्याला लिव्ह इनमध्ये राहण्याचा पर्याय सुचवते. यानंतर दोघांचे नाते चांगलेच गुंतते. इतके की, पुढे दोघेही खोट्या लग्नाच्या खोट्या बाता मारताना दिसतात.

दिनेश विजान निर्मित हा चित्रपट लक्ष्मण उतेकरने दिग्दर्शित केला आहे. क्रिती कार्तिकचा हा रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा येत्या १ मार्चला प्रदर्शित होत आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like