कार्तिक आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाही – क्रिती सेनन

कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन ‘लुका छुपी’ चित्रपटाच्या माध्यमातून चांगलेच प्रसिद्ध झाले होते. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली.
गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आले होते. चित्रपटाच्या यशाचे संपूर्ण श्रेय कार्तिकला झोळीत पडल्यामुळे क्रिती नाराज असल्याची चर्चा रंगली होती. कार्तिकने मात्र या सर्व अफवा असल्याचे सांगितले आहे. आमच्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे कार्तिक म्हणाला आहे. तर क्रितीने या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
‘कार्तिक आणि माझ्यात नेहमी मस्ती चालू असते. आता आम्ही आमच्या कामात व्यस्त असल्यामुळे मैत्रीला पुरेसा वेळ देवू शकत नाही. परंतू सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही एकमेंकाच्या संपर्कात असतो.’ , असं क्रिती म्हणाली होती. त्यामुळे आपल्यात कोणतेही मतभेद नाहीत असंच या दोघांचंही म्हणणं आहे.