रकुल प्रीत पाठोपाठ करिश्मा प्रकाशही चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल

रकुल प्रीत सिंह पाठोपाठ करिश्मा प्रकाशदेखील चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. करिश्मा प्रकाश दीपिका पदुकोणची मॅनेजर असून ड्रग्स प्रकरणात तिचंदेखील नाव समोर आलं आहे. त्यामुळे करिश्माचीदेखील एनसीबी चौकशी करणार आहे.

करिश्मा प्रकाशचं नाव आल्यामुळे बुधवारी एनसीबीने तिला समन्स बजावले होते. त्यानंतर   ती चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाली आहे.  रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली. सुशांतची मॅनेजर जया साहाच्या चौकशीदरम्यान दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचंही नाव समोर आलं. दीपिकाची मॅनेजर करिश्मा आणि जया यांच्यातदेखील ड्रग्सविषयी बोलणं झाल्याचं चॅटमधून उघडकीस आल्याचं म्हटलं जात आहे.

 

You might also like