तैमूरच्या लोकप्रियतेबद्धल करीना म्हणाली……

करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विद करण’ सीझन ६चा अंतिम एपिसोडमध्ये करीना कपूर आणि प्रियंका चोप्रा या दोघींने हजेरी लावली होती. यावेळी करीनाने सांगितले की, जेव्हा मीडिया, फोटोग्राफर्स त्याचे फोटो घेतात तेव्हा तीला भीती वाटते. कारण तो एक लहान मुलगा आहे आणि तो लाइम लाइटमध्ये जीवन जगतो आहे.

करीनाने पुढे सांगितले की, “तैमूर पॅपाराझींचा खुप लाडका आहे. त्यांना त्याचे फोटो काढायला खुप आवडतात. त्यामुळे ते तैमूरचे मित्रच झाले आहेत आणि तैमूर पण खुप फ्रेंडली मुलगा आहे. त्यामुळे ते जेव्हा त्याला हाक मारतात, तेव्हा तो लगेच त्यांना हात हलवून प्रतिक्रीया देतो.”

करण जोहरने तैमूरच्या डॉलबद्दल करीनाला विचारले असता ती म्हणाली की, तो डॉल अजिबात माझ्या तैमूरसारखा नाही आहे. डॉलचे डोळे नीळे आहेत, त्याचे केस विचित्र आहेत आणि बंद गळ्याचे जॅकेट. असा माझा मुलगा अजिबात नाही आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like