लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत करिना कपूर खान म्हणते…

करीना कपूर खान आता राजकारणात प्रवेश करणार का? अशी चर्चा सध्या रंगली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत करीनाला भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या,अशी मागणी काँग्रेसचे स्थानिक नेत्यांनी केली आहे.

मात्र करिना हिने आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘राजकारणात उतरण्याचा माझा कोणताही विचार नाही, केवळ अभिनयावरच लक्ष केंद्रीत करायचं आहे’, असं करीना म्हणाली.

याशिवाय, करिना कपूर ही पतौडी कुटुंबाची सून आहे.भोपाळमध्ये काँग्रेसला तिच्या उमेदवारीचा चांगला फायदा होऊ शकतो. महिला असल्यामुळे महिलांकडूनही तिला पाठिंबा मिळेल.करीना तरुणाईमध्ये अतिशल लोकप्रिय आहे. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे.त्यामुळे करिनाला उमेदवारी देण्याबाबत विचार व्हावा अशी मागणी मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली होती. पण आता खुद्द करिनानेच आपण निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like