करीनाने तैमुरसाठी घेतला ‘हा’ निर्णय

करीना कपूर लवकरच छोट्या पडद्यावर आगमन करणार आहे. टेलिव्हिजन विश्वातील तिच्या या पदार्पणासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शो मधून ती छोट्या पडद्यावर परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
कोरिओग्राफर बॉस्को मार्टीस व रॅपर रफ्तार यांच्यासोबत करीनाही परीक्षण करत आहे. करीनाने नुकतच एका मुलाखतीत सांगितले की, “मी टेलिव्हिजन पदार्पण करत असले तरीसुद्धा मी फार वेळ शूटिंगसाठी देऊ शकत नाही. मी दिवसातून केवळ आठ ते दहा तासंच शूटिंग करणार आहे.” तैमूरसाठी तिने हा निर्णय घेतला आहे.
“मी आठ तासांपेक्षा जास्त वेळ शूटिंग करणार नाही असे मी निर्मात्यांना सांगितले आहे. कधीतरी मी बारा तास शूटिंग करू शकते. निर्मात्यांनी ही अट मान्य केली आहे. ही ऑफर आल्यानंतर मी काही वेळ विचार केला पण आता स्पर्धकांचे परीक्षण करण्यासाठी मीच खूप उत्सुक आहे. ‘डान्स इंडिया डान्स’चा रंगमंच सुद्धा बदलला आहे. सेटवर जवळपस २०० कॅमेरा असणार आहेत.” असेही करीनाने सांगितले.