इरफान खानसोबत ‘या’ चित्रपटाच्या सिक्वलमध्ये झळकणार करीना कपूर

हिंदी मीडियम चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्माते भूषण कुमार व दिनेश विजन यांनी या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा केली होती. याच दरम्यान इरफानला कॅन्सर असल्याचे निदान झाले आणि त्याला उपचारासाठी लंडनला जावे लागले. आता इरफान भारतात परतला आहे.
इरफान भारतात परतल्यानंतर पुन्हा हिंदी मीडियम २च्या कामाला सुरूवात झाली. या चित्रपटाची स्क्रीप्ट तयार असून इरफानची या चित्रपटाची कथादेखील वाचून झाली आहे. इरफानने या चित्रपटाला होकार दिल्यावर या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करण्यात येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटात इरफानसोबत अभिनेत्री करीना कपूरला घेण्याचा विचार सुरू आहे. तिला या स्क्रीप्ट वाचून दाखवली असून तिला आवडली देखील आहे. निर्मात्यांना आशा आहे की हिंदी मीडियम २मध्ये काम करायला तयार होईल.
महत्वाच्या बातम्या –