करण जोहर ट्रोल्सविरोधात घेणार लीगल ऍक्‍शन?

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्यानंतर बॉलीवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रिटींना ट्रोल केले जात आहे. यात पहिले नाव करण जोहरचे आहे. चाहत्यांना असे वाटते की, सुशांतचा नेपोटिझने बळी घेतला असून यासाठी करण जोहर जबाबदार आहे.

यामुळे सोशल मीडियावर करणला ट्रोल करण्यात येत आहे. तर काही संतप्त झालेल्यांनी करणच्या मुलांना थेट मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे करण जोहर अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून करण हा कायदेशीर कारवाई करण्याची तयारी करत आहे. यासाठी काही वकिलांचे आणि ऑनलाईन टेक एक्‍सपर्टसची तो मदत घेत आहे. तसेच धमकी देणा-या सोशल मीडिया हॅंडलचा ते मागोवा घेणार आहे.

हे अकाउंट्‌स खरे आहे की बनावट आहेत याचा ते शोध घेतील आणि मग ते त्या संबंधित पुरावे ठेवतील. ज्यांनी आपल्या मुलांवर भाष्य केले आणि आईला धमकावले आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे.

दरम्यान, करण जोहरसह आलिया भट्ट, सलमान खान, सोनम कपूर, महेश भट्ट यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी ट्रोल्सचा सामना करावा लागत आहे. सुशांतच्या आत्महत्यानंतर करण जोहर सोशल मीडियावर परत आला नाही. अलीकडेच रिया चक्रवर्तीनेही सोशल मीडियावर अशा प्रतिक्रिया देणा-या दोघांविरूद्ध सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

 

You might also like