करण जोहरने डिवचले! राजकुमार रावने सुनावले!!

करण जोहरचा ‘कॉफी विद करण’ या चॅट शोचे सहावे सीझन कायम चर्चेत आहे. या शोमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आपल्या खासगी आयुष्याबद्दलचे खुलासे केलेत. करणच्या या शोवर लवकरच अभिनेता राजकुमार राव हजेरी लावणार आहे. या एपिसोडचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.

या प्रोमोमध्ये करण जोहर राजकुमारला असे काही डिवचून बोलला की, ते ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. मग काय, राजकुमारनेही करणला रोखटोक उत्तर दिले. प्रोमोत करण जोहर आपल्या जोड्यांच्या, सूटाच्या किमतीवरून राजकुमारला डिवचतो. माझ्या जोड्यांची किंमत तुझ्या शाळेच्या फीपेक्षा अधिक आहे. माझ्या जॅकेटची किंमत तुझ्या ईएमआयपेक्षा जास्त आहे, असे करण राजकुमारला म्हणतो. यावर राजकुमार आपला हात दाखवत तुला ठाऊक आहे ना, ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची किंमत आहे, असे करणला सुनावतो.

चित्रपटात गे कॅरेक्टर साकारायचे असेल तर तू तुझ्या अपोझिट कुणाला घेशील? असा एक प्रश्नही करण राजकुमारला करतो. यावर राजकुमार अन्य कुणाचे नाही तर करणचेच नाव घेतो.

महत्वाच्या बातम्या –

You might also like