नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने करण जोहरला नोटीस पाठविली आहे..

गेल्या वर्षी एका पार्टीत पार्टीत करणचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड चित्रपटाचे निर्माता करण जोहरला नोटीस पाठविली आहे. ब्युरोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी जोहरला नोटीस पाठविली गेली आहे.
ते म्हणाले की आम्ही जोहरला या व्हिडिओसंदर्भात 18 डिसेंबरपर्यंत माहिती देण्यास सांगितले आहे. त्याचे प्रतिनिधी आमच्याकडे व्हिडिओविषयी स्पष्टीकरण देऊ शकतात.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर करण जोहरने त्या व्हिडिओसंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे आहे की त्यांच्या पार्टीत अंमली पदार्थांचे सेवन केल्याच्या बातम्या खोटया आहेत.
मी अंमली पदार्थांचे सेवन करीत नाही आणि मी अशा कोणत्याही पदार्थाचा वापर करण्यास प्रोत्साहन देत नाही,” असे करण म्हणाला