जुने सर्व वाद विसरुन करण जोहर कंगनासोबत काम करण्यास तयार

करणच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये कंगना रणौत आणि करण जोहर या दोघांमध्य मतभेद झाले. इतकंच नव्हे तर कंगनाने ‘घराणेशाहीचा झेंडा मिरवणारा’, ‘मूव्ही माफिया’ अशा शब्दांत टीका केली. संपूर्ण कलाविश्व या वादाने ढवळले गेले होते. आता हा सर्व वाद विसरुन करण कंगनासोबत काम करण्यास तयार झाला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द करणनेच हे स्पष्ट केलं आहे.‘माझ्या याआधीच्या चित्रपटांमध्ये कंगनाला साजेशी अशी भूमिका नव्हतीच. राहतो प्रश्न मी निर्मित केलेल्या चित्रपटांची. तर या चित्रपटांसाठी आजपर्यंत कुणाही दिग्दर्शकाने माझ्याकडे कंगनाचे नाव पुढे केले नाही. त्यामुळे कंगना माझ्या चित्रपटांत दिसली नाही. पण जर आगामी चित्रपटात मला वाटलं की एखाद्या भूमिकेसाठी कंगना योग्य आहे, तर तिला मी नक्कीच विचारेन. मला तिच्यासोबत काम करण्यास काहीच हरकत नाही. आमचे काही वैयक्तिक वाद होते म्हणून आम्ही एकत्र काम करणार नाही असं काहीच नाही,’ असं करण म्हणाला.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like