करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा; फॉरेन्सिक तपासात उघड

करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा असल्याची धक्कादायक बाब फॉरेन्सिक तपासात उघड झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात करण जोहरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या व्हिडीओनंतर करण जोहरने ही फक्त कौटुंबिक पार्टी होती. त्यात कोणतेही ड्रग्सचे सेवन झालेलं नाही, असे स्पष्टीकरण दिलं होतं.

मात्र दुसरीकडे काही कलाकार मंडळीनी करण जोहरच्या घरी होणाऱ्या पार्टीमध्ये सर्रास अमली पदार्थांचं सेवन केलं जात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे या व्हिडीओची सत्यता तपासण्यासाठी फॉरेन्सिक तपासणी केली गेली होती. त्या तपासणी अहवालात हा व्हिडीओ खरा असल्याचा उघड झालं आहे.त्यामुळे आता करण जोहर अडचणीत वाढ होऊ शकते. त्यामुळे येत्या काही दिवसात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून करण जोहरचीही चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

करण जोहर यांच्या पार्टीत अभिनेत्री दीपिका पदुकोण, मलायका अरोरा, झोया अख्तर याशिवाय अभिनेता रणबीर कपूर, अर्जून कपूर, वरुण धवन, विकी कौशल, शाहिद कपूर, अयान मुखर्जीचा समावेश होता. पार्टीतील व्हिडीओमुळे कलाकारांच्या एक्सप्रेशनमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत होते.

विकी कौशलने नेमकं त्याच वेळी नाक खाजवल्याने लोकांच्या मनात शंकाकुशंका वाढल्या. खरं तर विकीला डेंग्यू झाला होता, आणि तो तेव्हा कुठे बरा होत होता. तो गरम लिंबूपाणी पित होता. काही जण वाईन पित होते. व्हिडीओ काढण्याच्या पाच मिनिटं आधी माझी आई तिथे होती. म्हणजे ही कौटुंबिक-सोशल पार्टी होती. आम्ही गाणी ऐकली, खाल्लं-प्यायलं. गप्पा मारल्या’ असेही करण म्हणाला होता.

You might also like