करण जोहर ‘या’ सेलिब्रेटीला करतोय डेट ?

करण जोहरने आपला वाढदिवस मोठ्या उत्सवात साजरा केला. करणने त्याच्या ४७व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या फार जवळच्या व्यक्तीने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसिद्ध डिझायनर प्रबळ गुरूंगने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून करणला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर दोघांचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे.
प्रबळने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ‘प्यार किया तो डरना क्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा करण..’ असे लिहिले आहे.