संजय लीला भन्साळींसाठी करण-अर्जुन येणार एकत्र….!

संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटातून पुन्हा एकदा करण अर्जुन म्हणजेच सलमान खान आणि शाहरुख खान  ही जोडी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हे दोघे संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी देखील भन्साळी यांनी या कलाकारांसोबत वेगवेगळ्या सिनेमात काम केलेले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय लीला भन्साळी लवकरच आगामी चित्रपट घेऊन येणार आहेत. या सिनेमात ते शाहरूख खान व सलमान खान यांना रुपेरी पडद्यावर एकत्र आणणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संजय लीला भन्साळी लवकरच या चित्रपटाबाबतची घोषणा करणार आहेत. भन्साळी सलमान व शाहरूख या जोडीसोबत रुपेरी पडद्यावर धमाल करतील, अशी आशा आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like