कपूर कुटुंबात लवकरच अजून एक लग्न

कपूर कुटुंब लवकरच चाहत्यांना खुशखबर देणार आहेत. कपूर कुटुंबात २०१८  मध्ये सोनम कपूरच्या लग्नाची धूम होती. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कपूरची मुलगी रिया कपूर यावर्षी बॉयफ्रेंड करण बुलानीसोबत लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

करण बुलानी सोनम कपूरच्या लग्नात दिसला होता. तसेच रियाचा चुलत भाऊ मोहित मारवाहच्या लग्नात देखील करण बुलानी सहभागी झाला होता. तसेच रिया अनेकदा बॉयफ्रेंड करणसोबत इंस्टावर फोटो शेअर करत असते.रिया कपूरने आपल्या करिअरला सुरूवात ‘वेक अप सिध्द’ या सिनेमातून केली असून निर्माता म्हणून ‘आएशा’ हा तिचा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल केली नाही. रियाद्वारे निर्मित केलेली ‘खुबसुरत’ ही दुसरी फिल्म होती. तसेच रिया आणि सोनम एकत्र ‘रेसन’ नावाचा एक फॅशन ब्रँड देखील चालवतात.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like