कपिल शर्मा सुरू करणार आणखी दोन नवे कॉमेडी शो

कॉमेडी किंग कपिल शर्मासाठी २०१६ हे वर्ष चांगलंच धमाकेदार राहिलं. त्याचा सोनी टिव्हीवरील नवा शो ‘द कपिल शर्मा शो’ हा धमाक्यात सुरू झाला. त्याचा एक वर्षाचा कॉन्ट्रॅट वाढवण्यात आला त्यासाठी त्याला १०० कोटी देण्यात आले. त्यामुळे टिव्हीवर सर्वात जास्त पैसे घेणारा तो कलाकार ठरला. आता २०१७ हे वर्षीही तो धमाका करणार आहे. त्याने २०१७ मध्ये आपल्या चाहत्यांसाठी गिफ्ट दिलं आहे.

कपिल शर्माने २०१७ च्या सुरूवातीला आपल्या ट्विटरवरून एक पोस्टर शेअर केलं. त्याने ट्विट करून चाहत्यांना माहिती दिली की, नव्या वर्षा पहिली आनंदाची बातमी…K9 नव्या वर्षात दोन आणखी नवे कॉमेडी शो प्रोड्य़ूस करत आहे. आशा आहे की प्रेक्षकांना हे पसंत येतील’.

याचा अर्थ कपिल लवकरच धमाका करणार आहे. पण त्याने हे नाही सांगितले की, यात शोमध्ये काय असणार असणार? आणि आणखी कोण असणार? पण कपिल आहे म्हटल्यावर काहीतरी मोठं आणि धमाकेदारच असेल ना. कपिलसाठी २०१६ हे वर्ष धमाकेदार राहिलं. तर दुसरीकडे तो वादातही सापडला होता. बीएमसीने त्याला अवैध बांधकामासाठी नोटीसही बजावली होती.

You might also like