कपिलला आली सुनील ग्रोवरची आठवण

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात असणाऱ्या समीकरणाविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. कपिल आणि सुनीलच्या या नात्यात एक असं वादळ आलं, ज्यानंतर या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. पण, तरीही नात्यात असणारा ओलावा मात्र कमी झालेला नाही. कपिलच्या लग्नाच्या निमित्ताने सुनीलने त्याला शुभेच्छा दिल्या आणि पुन्हा एकदा त्यांच्या मैत्रीचे बंध सर्वांनाच पाहायला मिळाले.

कपिल काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकला. कपिलच्या काही कलाकार मित्रांची उपस्थिती पाहायला मिळाली. मात्र,या गर्दीत सुनील मात्र कुठेच दिसला नाही. त्याच्या न येण्याने बऱ्याच प्रश्नांनाही वाचा फुटली. पण, अखेर खुद्द सुनीलनेच कपिलला शुभेच्छा देत या चर्चा शमवल्या.

सुनीलने दिलेल्या या शुभेच्छा पाहून कपिलनेही त्याचे मनापासून आभार मानत, सुनीलची खूप आठवण आल्याचं सांगितलं. सोबतच त्याला आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like