‘हा’ दाक्षिणात्य अभिनेता झळकणार कपिल देवच्या बायोपिकमध्ये

१९८३च्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार असून या चित्रपटातील आणखी एका भूमिकेवरील पडदा दूर झाला आहे.

या चित्रपटामध्ये भारताचा माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा श्रीकांत साकारणार आहे. या भूमिकेत हुबेहूब श्रीकांत सारखं दिसण्यासाठी जीवा सध्या जीममध्ये वर्कआऊट करत आहे. विशेष म्हणजे त्याने आतापर्यंत ७ किलो वजन कमी केलं आहे. काही दिवसांपूर्वीच पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या –

You might also like