कंगनाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा , म्हणाली…

सुशांत सिंह राजपूत कथित आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजिव आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मौन सोडलं आहे. आदित्य ठाकरे यांनी एक फेसबूक नोट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी हे गलिच्छ राजकारण असल्याचे नमूद केले आहे. आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे.

रिया चक्रवर्तीला ईडीकडून समन्स; सीबीआयही सज्ज

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिनं थेट आदित्य ठाकरे यांना निशाणा साधला आहे. एकापाठोपाठ चार ट्वीट करून कंगना हिनं आदित्य ठाकरे यांनी 7 सवाल केले आहेत.मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी FIR का नोंदवली नाही? फेब्रुवारीमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली होती की, सुशांतच्या जीवाला धोका आहे. मग मुंबई पोलिसांनी सुशांतचा मृत्यूला ‘सुसाइड’ का घोषित केलं? आपल्याकडे फॉरेंसिक एक्सपर्ट का नाही आहे. सुशांतच्या फोन रेकॉर्ड का उपलब्ध नाहीत.

‘मी आजही संयम ठेऊन आहे’ अशा प्रकारचे उद्गार काढणे म्हणजे आदित्य ठाकरे धमकी देत आहेत का?

त्यानं मृत्यूच्या एक आठवडा आधी कोणाकोणाला फोन केले होते?  आयपीएस अधिकारी विनय तिवारीला विनाकारण क्वारंटाइन का करण्यात आलं? सीबीआय चौकशीच्या मागणीची सगळ्यांना भीती का वाटत आहे? रिया आणि तिच्या कुटुंबीयांनी सुशांतचा पैसा कसा लुटला? असे एकापाठोपाठ सात प्रश्नांचा भडिमार कंगनानं आदित्य ठाकरे यांना केला आहे.

 

You might also like