राममंदिर भूमिपूजनावर चित्रपट साकारणार – कंगना राणावत

कंगना राणावतने बुधवारी अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने तिच्या “अपराजिता अयोध्या’ या चित्रपटाविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केली. ती म्हणाले की, हा चित्रपट राममंदिराच्या संपूर्ण 600 वर्षांच्या इतिहासावर आधारित असेल.

सारा अली खानने आपल्या भावाला दिली लाच

या चित्रपटात “मणिकर्णिका : द क्‍वीन ऑफ झांसी’चे लेखक के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची मदत घेण्यात येणार आहे.या चित्रपटाविषयी कंगना म्हणाली, या मंदिरासाठी 600 वर्षे संघर्ष करावा लागला. बाबरने हल्ला करून ते पाडले होते. त्यानंतर 72 लढाया झाल्या. या राममंदिर निर्मितीसाठी काम केलेल्या मुस्लिमांची व्यक्तिरेखा माझ्या चित्रपटात असेल, अशी माहिती दिली.

सुशांतच्या आठवणीत अंकिता लोखंडे भावुक

रामराज्य हे सर्व धर्मांच्या पलीकडे असून या सर्वांचा उल्लेख “अपराजिता अयोध्या’ चित्रपटात असेल.कारण 600 वर्षांच्या प्रवास आणि त्यानंतर राममंदिर भूमिपूजन अशी असलेली ही पटकथा खूपच रोमांचक असणार आहे. त्याचे विजयेंद्र सरांनी खूप सुंदर लेखन केले आहे. राममंदिर फक्‍त एक मंदिर नसून एक भावना आहे. माझ्या दृष्टीने अयोध्या प्रतीकात्मक आणि मागील 500-600 वर्षांचा प्रवास आहे. जो माझ्यासाठी खूप रोमांचक असल्याचे कंगना म्हणाली.

You might also like