कंगणा रनौतच्या अडचणीत वाढ

शिवसेना आणि कंगणा रणौतमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. मुंबई महापालिकेने कंगणाला आणखी एक नोटीसा बजावली असून ती सुद्धा बेकायदेशीर बांधकाम संबंधीचीच आहे. त्यामुळे आता यावर पुन्हा शिवसेना विरुद्ध कंगणा असा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

कंगना रणौत हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या नव्या ट्वीटमुळे पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेनं कंगनाला आणखी एक झटका देण्याची तयारी केली आहे. कंगना रणौतच्या पाली हिल येथील कार्यालयातील बेकायदा बांधकामावर बीएमसीनं बुलडोझर फिरवला होता. 24 तासांच्या नोटिशीनंतर बीएमसीनं ही कारवाई केली होती. त्यानंतर आता बीएमसीनं कंगनाच्या खार येथील फ्लॅटमध्ये केलेल्या बेकायदा बांधकामावरून नोटिस बजावली आहे.

मुंबईताल खार वेस्ट येथील 16 नंबर रोडवरील एका बिल्डिंगमध्ये कंगना रणौतचा एक फ्लॅट आहे. बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर कंगना राहाते. विशेष म्हणजे पाचव्या मजल्यावर कंगनाचे एकूण तीन फ्लॅट आहेत. त्यापैकी एक फ्लॅट 797 sqft दुसरा फ्लॅट 711sqft आणि तिसरा फ्लॅट 459 sqft आहे. तिन्ही फ्लॅट्स कंगनाच्या नावावर आहेत. 8 मार्च 2013 रोजी तिन्ही फ्लॅटची रजिस्ट्री झाली होती.

कंगना हिनं फ्लॅट घेतल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच 13 मार्च 2018 रोजी बीएमसीकडे एक तक्रार आली होती. तिनं फ्लॅट्समध्ये बेकायदा बांधकाम केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. तक्रार मिळाल्यानंतर 26 मार्च 2018 रोजी बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी कंगनाच्या या फ्लॅट्सची पाहाणी केली होती. त्याच दिवशी कंगनाला BMC under 53/1 of MRTP act for unauthorized construction beyond plan नुसार नोटिस बजावण्यात आली होती. या नोटिशीला 27 मार्च 2014 रोजी बीएमसीच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती.

महत्वाच्या बातम्या:-

You might also like