‘मला महाराष्ट्र आवडतो’; कंगनाच्या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर कंगना रणौतने यु-टर्न घेतल्याचं दिसून येत आहे. ‘मला महाराष्ट्र आवडतो’, असं ट्विट कंगनाने नुकतंच सोशल मीडियावर केलं आहे. कंगनाने मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

तिच्या या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. मात्र आता तिने केलेल्या नव्या ट्विटमुळे अनेकांचं लक्ष तिच्याकडे वेधलं आहे.

“यश मिळाल्यानंतर मला अनेक मोठ्या बॅनरचे, दिग्गज कलाकार असलेल्या चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या होत्या. मात्र मी त्या सगळ्यांना नकार दिला. त्यावेळी मला प्रचंड विरोध सहन करावा लागला. या काळात मला बराच संघर्ष करावा लागला.

परंतु, मी केलेला पहिला स्वतंत्र चित्रपट म्हणजे मराठा इतिहासातील गौरवशाली छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी होता, कारण मला महाराष्ट्र आवडतो”, असं ट्विट कंगनाने केलं आहे.

You might also like