‘भाजपाच काय तर अन्य कोणत्याही पक्षामधून मी राजकारणात प्रवेश करणार नाही’

कंगना रणौत राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगत होती. मात्र एका कार्यक्रमामध्ये कंगनाने या मुद्द्यावर भाष्य करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘भाजपाच काय तर अन्य कोणत्याही पक्षामधून मी राजकारणात प्रवेश करणार नाही’, असं तिने स्पष्टपणे सांगितलं आहे.
मी बेधडकपणे बोलत असते, त्यामुळे माझ्या अशा स्वभावामुळे मी राजकारणात टिकू शकत नाही. मी कोणत्याही पक्षामध्ये बांधून राहिल्यासारखं काम करु शकत नाही”, असं कंगनाने यावेळी सांगितलं.
पुढे ती म्हणते, “पंतप्रधान नरेंद्र यांच्यामुळे मला काम करण्याची प्रेरणा मिळते. ते ज्या पद्धतीने त्यांचं काम करतात, जबाबदारी पार पाडतात ते पाहून मला बरंच काही शिकायला मिळतं. टिकांकडे लक्ष न देता आपण आपलं काम करत रहायचं हे मी त्यांच्याकडून शिकले. मात्र त्यांच्याशी मी माझी तुलना करत नाहीये”.