कंगनाचं जया बच्चन यांना सडेतोड उत्तर म्हणाली….

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे. या तपासा दरम्यान, कलाविश्वातील अनेक गोष्टी उघड होताना दिसत आहेत. यामध्येच कलाविश्वातील ड्रग्स पार्टी हा नवा मुद्दा आता चर्चेत आहे. कंगना रणौतने याविषयी भाष्य केलं आहे. मात्र अनेकांनी कंगनावर निशाणा साधला असून समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनीदेखील कंगनाला टोला लगावला आहे. मात्र आता कंगनाने जया बच्चन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“जयाजी, माझ्या जागी तुमच्या मुलीला श्वेताला जर कोणी मारहाण केली असती, तिला ड्रग्स दिले असते आणि तिच्यासोबत गैरवर्तणूक केली असती, तर तेव्हादेखील तुम्ही असंच म्हणाला असतात का? तसंच अभिषेक सातत्याने छळ व गुंडगिरीचा त्रास होतोय अशी तक्रार करत असेल आणि एक दिवस तो अचानक फासावर लटक्याचं दिसून आला तर ? आमच्यासाठी सुद्धा कधीतरी प्रेमाने हात जोडण्याचा प्रयत्न करा”, असं ट्विट कंगनाने केलं आहे. सोबतच तिने जया बच्चन यांचा सभागृहातील व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

महत्वाच्या बातम्या:-

You might also like