सर्व जगासमोर नग्न झाल्यासारखं वाटायचं – कंगना

कंगना राणावत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे . दिल्लीत एका कार्यक्रमासाठी हजर असलेल्या कंगनाने हृतिकचे नाव न घेता त्यासोबत आपले प्रेमसंबध असल्याचे सांगितले.

महिलांना क्रूरपणाला समोरे जाता तेव्हा काय होते. मी अशा क्रूर व्यक्तिंशी खंबीरपणाने लढली आहे. ज्यावेळी मी लढत होते तेव्हा मला एक स्त्री म्हणून दु:ख सहण करावे लागले, त्याकडे कुणीच लक्ष दिले नाही. जेव्हा मी पत्रे लिहिली ती जगासमोर अतिशय क्रूरपणे जगासमोर आली. त्यावेळी एक व्यक्ती म्हणून मला कसे वाटेल याचाही विचार केला गेला नाही. आपल्या जवळच्या व्यक्तींना लिहिलेल्या पत्रातून आपण भावना व्यक्त करीत असतो. मी रूममध्ये असताना अनेक रात्री रडली आहे. मला जगासमोर नग्न झाल्यासारखे वाटत होते. यावेळी तिने, तेरे प्यार मे डुबे हुऐ खत मै जलाता कैसे.. या गझलेच्या ओळी म्हणून दाखविल्या.

 

You might also like