कंगनाचा प्रसिद्ध फॅशन डिझायनरवर गंभीर आरोप

कंगना रणौत आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाणा साधला आहे. आता तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर अनाइता श्रॉफ अदजानिया हिच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

माझ्या परवानगीशिवाय माझे जुने फोटो अनाइताने स्वत:च्या प्रसिद्धीसाठी वापरल्याचा आरोप कंगनाने केला आहे. कंगनाने ट्विट करुन हे आरोप केले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियाव कंगनाचं हे ट्विट चांगलंच चर्चिलं जात आहे.

 

You might also like