…..म्हणून कंगनाने मानले अमित शाहंचे आभार

कंगना रणौत आणि शिवसेनेमध्ये शाब्दिक वादावादी सुरु आहे. तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केल्यामुळे तिच्यावर राजकीय तसेच कला क्षेत्रातून प्रचंड टीका करण्यात आली. कंगना रणौतचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबर शाब्दिक वाद चांगलाचा रंगला आहे.

‘९ सप्टेंबरला मुंबईत येतेय कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबवून दाखवा’ असे थेट आव्हानच कंगनाने दिलं आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेबरोबर सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे असे सूत्रांनी सांगितले.

मी अमित शाहंची आभारी आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता अमित शाह मला काही दिवसांनी मुंबईला जाण्याचा सल्ला देऊ शकत होते. पण त्यांनी भारताच्या एका मुलीला दिलेल्या वचनाचा मान राखला” असे कंगनाने तिच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

bollywoodBollywood News in Marathi – Get latest Entertainmentcelebrity gossipsHollywood newsMarathimovie reviewsphotostrailersTV show newsupdatesvideos. जाणून घ्या बॉलीवुडकंगनाफिल्मनगरीच्या ताज्या बातम्याबॉलिवूड गॉसिप्सबॉलिवूड घडामोडीबॉलिवूडचे नवीन चित्रपटमराठी