मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर असा करणारी कंगणा राणावत हाथरसच्या प्रकरणावर म्हणाली…

हाथरस प्रकरणामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हाथरस येथील युवतीवर झालेला बलात्कार आणि तिच्या अमानुष हत्येचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून आज सर्व राज्यांमध्ये जिल्हापातळीवर सत्याग्रह करणार आहे.

एका बाजूला योगी सरकारवर टीका होत आहे तर दुसऱ्या बाजूला मुंबई पोलिसांवर निशाणा साधणारी अभिनेत्री कंगना राणावत या प्रकरणात गप्प का असा सवाल उपस्थित होत होता. अखेर कंगनाने आपले मौन सोडले असून तिने या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मला योगी आदित्यनाथ यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. जसं प्रियांका रेड्डीच्या प्रकरणातील दोषींना ज्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला त्या ठिकाणी मारण्यात आलं त्याच प्रमाणं हाथरसच्या पीडितेलाही न्याय मिळायला हवा, असं कंगणाने म्हटलं आहे.

दरम्यान, हाथरस येथील दलित महिलेवर झालेला सामूहिक बलात्कार आणि तिच्या मृत्यूचे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने हाताळले, त्याबद्दल त्यांची पदावरून हकालपट्टी करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे. हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही मागणी केली आहे.

तर दुसऱ्या बाजूला हाथसर बलात्कार प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने केला जाऊ शकतो. तसेच त्या पीडितेच्या कुटूंबाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या राज्याकडे सोपवावा अशी मागणी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

दरम्यान, बसपा प्रमुख मायावती यांनी योगींना एक सल्ला दिला आहे. बसपाच्या नेत्या मायावती यांनी हाथरस प्रकरणात सरकारच्या भूमिकेसंदर्भात ट्विट केलं आहे. हाथरसमध्ये माध्यमांसोबतही गैरवर्तन करण्यात आलं. काल, परवा विरोधी पक्षांचे नेते व लोकांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार.. हे सगळं अतिशय निषेधार्ह व लज्जास्पद आहे. सरकारला ही अहंकारी व हुकुमशाही वृत्ती बदलण्याचा सल्ला आहे. नाहीतर यामुळे लोकशाहीची मूळच कुमकूवत होतील,” असा सल्ला मायावती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे.

You might also like