कंगना राणावत शेतकऱ्यांनाच म्हणाली आतंकवादी !

गेल्या काही दिवसांपासून, किंबहुना ठामपणे आपल्या भूमिका सातत्यानं मांडत आलेली अभिनेत्री कंगना राणौत ही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकते. मागील काही दिवसांमध्ये याचा अनेकदा प्रत्यय आला आहे. मुंबई पोलीस, मुंबईविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारी ही अभिनेत्री पाहता पाहता शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेच्या निशाण्यावर आली. तरीही तिनं आपली टीकास्त्र काही कमी केली नाहीत. आता याच अभिनेत्रीनं एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
कृषी विधेयकं दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाल्यानंतर हरियाणा, पंजाब या भागांमध्ये आंदोलनांनी डोकं वर काढलं. काही शेतकरी संघटनांनीही असाच सूर आळवला. ही परिस्थिती पाहता खुद्द पंतप्रधानांनी एक ट्विट करत बळीराजाला हमी देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच ट्विटचा आधार घेत बी- टाऊनच्या क्वीननं तिचं मतही मांडलं.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, जो झोपी गेला आहे त्याला जागवता येऊ शकतं. ज्याला गैरसमज आहेत ते दूरही करता येऊ शकतात, त्यांची समजूत काढता येऊ शकते. पण, झोपण्याचं आणि काहीही न समजल्याचा अभिनय कोणी करत असेल तर तसं सोंग कोणी घेत असेल त्यांना समजावण्यामुळं काय फरक पडणार आहे? CAA ला विरोध करणारे हे तेच दहशतवादी आहेत. CAA विरोधातील आंदोलनात रक्ताचे पाट वाहिले. पण, या कायद्यामुळं एकाही व्यक्तीचं नागरिकत्व हिरावलं गेलं नाही’, असं कंगनानं तिच्या ट्विटमध्ये लिहिलं.
प्रधानमंत्री जी कोई सो रहा हो उसे जगाया जा सकता है, जिसे ग़लतफ़हमी हो उसे समझाया जा सकता है मगर जो सोने की ऐक्टिंग करे, नासमझने की ऐक्टिंग करे उसे आपके समझाने से क्या फ़र्क़ पड़ेगा? ये वही आतंकी हैं CAA से एक भी इंसान की सिटिज़ेन्शिप नहीं गयी मगर इन्होंने ख़ून की नदियाँ बहा दी. https://t.co/ni4G6pMmc3
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 20, 2020