कंगनाने केलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ट्विट

कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. अलिकडेच तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी पंगा घेतला होता. तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या विधानामुळे शिवसेना व कंगनामध्ये जणू शाब्दित युद्धच सुरु झालं.

त्यानंतर आता पुन्हा एकदा कंगनाने असंच एक वक्तव्य केलं आहे. तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आहे. आग्रा येथे बांधण्यात येणाऱ्या संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. त्यांच्या या घोषणेवर आनंद व्यक्त करताना कंगनाने स्वत:च्या पूर्वजांबद्दल माहिती दिली.

त्यावेळी तिने शिवाजी महाराजांचाही उल्लेख केला. “ज्या प्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्वज बिहारमध्ये होते. त्याच प्रमाणे काही थिअरींच्या आधारावर शिवाजी महाराजांचा संबंध जयपुर राजघराण्याशी दाखवता येतो. माझा जन्म हिमाचलमध्ये झाला आहे. परंतु माझे पूर्वज रणौत यांचा संबंध उदयपुरशी येतो. माझं कुळ दैवत आई अंबिका आहे.” अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं आहे.

You might also like