कंगणा राणवतला झेड-प्लस सुरक्षा द्या!

कंगणा राणावतला मुंबईत सुरक्षेसाठी वाय सुरक्षा देण्यात आली होती. मात्र आता तिची सुरक्षा वाढवा तिला झेड-प्लस सुरक्षा द्या, अशी मागणी उत्तर प्रदेशातील भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी केली आहे.

अनाधिकृत बांधकाम आहे, असं म्हणत बी.एम.सी ने कंगणा राणावतचं मुंबईतील आॅफिसवर तोडफोड केली. सरकारसुद्धा बरखास्त करा, अशी नंदकिशोर गुर्जर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

कंगणाने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मिर सोबत केली होती. त्यानंतर ट्विटरवर #आमचीमुंबई नावाचा हॅशटॅग ट्रेंड झाला. अनेक मुंबईकरांनी किंवा राजकारण्यांनी यावर टीका केली. या एका ट्विटमुळे वादाला तोंड फुटलं. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरसुद्धा तिने अनेकांना दोषी ठरवलं होतं.

You might also like