थलाइवीच्या शुटिंगसाठी कंगना दक्षिण भारतात रवान

‘थलाइवी’ या चित्रपटातील कंगना रणावतचा पहिला लुक टीजर आणि पोस्टर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. “थलाइवी’ हा चित्रपट तमिळनाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित असून, चित्रपटात कंगना जयललिताच्या भूमिकेत झळकणार आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व चित्रपटांचे शूटींग थांबले होते. मात्र, आता काही मार्गदर्शक सूचनांनुसार  चित्रीकरण पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व कलाकारांनी त्यांचे उर्वरित प्रोजेक्टचे काम सुरू केले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता कंगना 7 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर थलाइवी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. कंगनाने स्वत: तिच्या सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

कंगना म्हणाली की, “मित्रांनो आज एक खास दिवस आहे. मी आज संपूर्ण 7 महिन्यांनंतर कामावर परत येत आहे. माझ्या अत्यंत महत्वाकांक्षी द्विभाषिक प्रकल्प थलाइवी चित्रपटासाठी मी दक्षिण भारतात जात आहे. महामारीच्या वेळी तुमच्या प्रार्थनेची आवश्यकता आहे. आशा आहे की, मी आज सकाळी शेअर केलेले सेल्फी तुम्हाला आवडतील”. अशा आशयाचे ट्विट कंगनाने केलं आहे.

 

You might also like