पत्रकाराशी पंगा घेणं कंगनाला पडणार भारी; मीडियाने टाकला सिनेमावर बहिष्कार

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोल चंडेल यांना संपूर्ण मीडियाला अपशब्द वापरून त्यांच्याशी पंगा घेणं भारी पडणार आहे. या सर्व प्रकरणानंतर गिल्ड ऑफ इंडियानं ‘जजमेंटल है क्या’ या कंगनाच्या आगामी सिनेमाला कोणत्याही प्रकारचं कव्हरेज न देण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थेनं कंगनाचा या सिनेमावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

या पत्राच्या सब्जेक्ट लाइनमध्येच कंगनानं त्या कार्यक्रमात पत्रकाराशी केलेल्या गैरवर्तनासाठी तिच्यावर टीका करण्याची मागणी केली आहे. या पत्रात लिहिलं, तुमच्या टीमनं आमच्याकडे अंधेरीमध्ये तुम्ही आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये येऊन हा इव्हेंट कव्हर करण्याची विनंती केली होती. या इव्हेंटमध्ये अभिनेता राजकुमार राव सोबत कंगना रणौत सुद्धा होती. आमच्या एका पत्रकारानं तिला प्रश्न विचारल्यानंतर ती त्याच्यावर भडकली. तसेच त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासही तिनं नकार दिला.

Entertainment Journalist’s Guild of India लिहिलेल्या या पत्रात पुढे लिहिलं आहे. हा प्रकार घडला त्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होता त्यामुळे तुम्हाला याबाबत सर्व माहित आहे. आम्ही तुमच्याकडे एक लेखी पत्र आणि कंगनाकडून झालेल्या गैरवर्तनावर टीका करण्याची मागणी करत आहोत. यासोबतच या प्रकारासाठी कंगनाचा आगामी सिनेमा पूर्णपणे बॉयकॉट करण्यात येणार असून या सिनेमाला कोणत्याही प्रकारचं कव्हरेज मिळणार नसल्याचं या पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.

You might also like