“ना डरूंगी, ना झुकूँगी…” म्हणत कंगनाने दिले संजय राऊत यांना पुन्हा चॅलेंज

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई शहराबाबतच्या बेताल वक्तव्यानंतर एका वेगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं मुंबईत येऊ नये, असं म्हटलं होत.

आज 9 सप्टेंबर कंगना राणावतने ट्वीटमध्ये सांगितल्याप्रमाणे आज ती मुंबईत दाखल होणार आहे. अशातच कंगनाच्या मुंबई दौऱ्यासाठी कंगनाला केंद्रीय गृहमंत्र्यांकडून कंगनाला ‘वाय’ सुरक्षा देण्याचा आली आहे. मुंबईत येण्यापूर्वी म्हणजेच, आज सकाळी कंगनाने आणखी एक ट्वीट केलं आहे.

त्यामध्ये ती म्हणाली आहे की, ‘राणी लक्ष्मीबाईंचा पराक्रम, शौर्य आणि बलिदान मी चित्रपटामार्फत जगले आहे. दुःखद गोष्ट म्हणजे, मला माझ्याच महाराष्ट्रात येण्यापासून रोखण्यात येत आहे. मी राणी लक्ष्मीबाईंच्या आदर्शांवर चालणार आहे. नाही घाबरणार, नाही झुकणार. अन्यायाविरोधात आवाज उठवत राहणार. जय महाराष्ट्र, जय शिवाजी’ असा कंगना म्हणाली.

दरम्यान, त्यानंतर कंगनाने सुद्धा सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले. कंगना म्हणाली कि, ‘अनेकांनी मी मुंबईत न येण्याची धमकी मला दिली आहे. पण आता मी मुंबईत येणारच आहे. येत्या 9 सप्टेंबरला मी मुंबईत येणार हे नक्की आहे. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला त्यांनी रोखून दाखवावं.’ असा इशारा कंगनाने दिला.

You might also like